टाकण्याचे काम २३ महिन्यात पूर्ण
-----------------------------------
१२ अभियंते आणि १५० कर्मचारी राबले
-------------------------------------
८८२.६८ कोटी रुपयांचा एकूण प्रकल्प खर्च
सोलापूर : ११० किलोमीटर उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम अखेर २३ महिने १५ दिवसांनी पूर्ण झाले आहे. लवकरच याची चाचणी घेण्यात येणार आहे. दरम्यान १२ अभियंते आणि १५० कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केले आहे. एक-दोन दिवसात या कामाची चाचणी करण्यात येणार आहे.
सोलापूर शहरासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणाऱ्या उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम अखेर १५ मे रोजी पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते मात्र विविध अडथळे आणि शेतकऱ्यांचा झालेला विरोध यामुळे या कामात विलंब झाला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नदी द्वारे सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे सुमारे २० टीएमसी पाणी बचत होणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर उजनी धरणात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर करण्यात येणारी दुबार अथवा तिबार पंपिंग करण्याची गरज भासणार नाही.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्या माध्यमातून १२ अभियंते आणि १५० कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केले आहे.
सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव धरून उजनी - सोलापूर दुहेरी वाहिनी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे सोलापूर शहरास दररोज १७० दशलक्ष लिटर (एम एल डी) पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे (२६.३० मी. x ३१.५० मी. X १८.५० मी.), पंपींग मशीनरी (११५० एच.पी. ६ नग), अशुद्ध पाण्याची दाब नलिका (१५२४ मिमी व्यास १४ मिमी जाड एम.एस. पाईप लांबी २८.५० कि.मी.), बी.पी.टी. (क्षमता ६.५० लक्ष लिटर्स), अशुद्ध - पाण्याची उतार नलिका (१४७३/१४२२/११६८ मिमी व्यास १२ मिमी जाड एम.एस. पाईप लांबी - ८१.५० कि.मी.) असे एकूण ११० कि.मी. पाईपलाईन, क्रासिंग्स (रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ईतर रस्ते , कॅनाल, सीना नदी असे एकूण ६३ नग) इत्यादी कामांचा समावेश आहे.
हे काम १ जून २०२३ रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २१ महिने आहे (नोव्हेंबर २०२४ अखेर). त्यांनतर ३ महिने प्रात्यक्षिक चाचणी व ३ वर्ष देखभाल व दुरुस्ती कालावधी आहे. अखेर
अखेर २३ महिने १५ दिवसांनी म्हणजेच १५ मे २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. ६३ अडथळे
(क्रासिंग्स) पूर्ण करण्यात आले.
√√ ८८२.६८ कोटी रुपयांचा
आहे एकूण प्रकल्प खर्च
या योजनेचा आकृतीबंध - स्मार्ट सिटी हिस्सा २५० कोटी रुपये, एनटीपीसी कंपनी हिस्सा २५० कोटी रुपये, महाराष्ट्र -
शासन (नगरोत्थान) - ३८२.६८ कोटी रुपये आहे. असे एकूण ८८२.६८ कोटी रुपयांचा
प्रकल्प खर्च आहे.
√√ उजनी धरण ते पाकणी, सोरेगावपर्यंत असा होणार दुहेरी जलवाहिनीतून पाणीपुरवठा
उजनी धरणातून थेट चॅनेल मधून जॅकवेल मध्ये पाणी सोडण्यात येईल. उजनी तेथून उजनी पंप हाऊस मधून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवडे येथील ब्रेक प्रेशर टॅंक (बीपीटी) येथून गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) पद्धतीने पाणी पुढे ८० किलोमीटर अंतरावर पाकणी सोरेगाव पंप हाऊस येथे आणण्यात येणार आहे. दररोज १७० दशलक्ष लिटर (एम एलडी) पाणी उपसा करण्यात येणार आहे.
√√ वेल्डिंग पूर्ण आता
काँक्रिटीकरण करणार
११० किलोमीटर उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. वेल्डिंगही करण्यात आली आहे. बेंड असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यामुळे एक - दोन दिवसात चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली.
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन
आजपासून सोलापुरात
--------------------------------
मुख, गर्भाशय मुख, स्तन कर्करोग
संदर्भात होणार तपासणी
--------------------------------
सोलापूर : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची विभागाची कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दि. 17 ते 19 मे 2025 या दरम्यान
सोलापूर शहरांमध्ये उपलब्ध राहणार आहे. यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर व बायोप्सी (biopsy), गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी तसेच स्तन कर्करोग बायोप्सीसाठी आवश्यक असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.
कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे उदघाटन केले. यांमध्ये प्रामुख्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे. दि. 17 ते 19 मे 2025 या कालावधीमध्ये ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोलापूर शहरांमध्ये उपलब्ध राहणार आहे. ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज आहे.
ही व्हॅन प्रथम माळशिरस तालुका त्यानंतर पालखी मार्गाप्रमाणे सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, बार्शी ,उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर असा दौरा करत अखेरीस सोलापूर शहरांमध्ये दि. 17 मे रोजी एस आर पी कॅम्प, सोरेगाव , दि. 18 मे रोजी दाराशा आरोग्य केंद्र अणि 19 मे रोजी विडी घरकुल येथे उपलब्ध असेल. सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
============@@===========
No comments:
Post a Comment